म्यानमारमध्ये लष्करशाहीला विरोध; नागरिकांची 'सोशल' कोंडी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 7, 2021

म्यानमारमध्ये लष्करशाहीला विरोध; नागरिकांची 'सोशल' कोंडी

https://ift.tt/2MGxoye
यांगून: म्यानमारमधील बंडानंतर सत्ता ताब्यात घेतलेल्या लष्कराविरोधात जनतेने निदर्शने सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर, म्यानमारच्या लष्करी प्रशासनाने सोशल मीडियावर घातलेले निर्बंध अधिक कडक केले आहेत. फेसबुक आणि संबंधित अॅपनंतर, आता ट्विटर आणि इन्स्टाग्रामही बंद करण्यात आले आहेत. या दोन्ही व्यासपीठांचा वापर खोट्या बातम्यांचा प्रसार करण्यासाठी होत असल्याचा दावा करून, लष्करी प्रशासनाने शुक्रवारी ट्विटर आणि इन्स्टाग्रामची जोडणी तोडण्याचे निर्देश दूरसंचार कंपन्या; तसेच इंटरनेट सेवा पुरवठादारांना दिले. शुक्रवारी रात्री, सलग चौथ्या रात्री नागरिकांनी यांगून येथे भांडी वाजवून लष्करी प्रशासनाचा आणि राजकीय नेते व कार्यकर्त्यांच्या अटकसत्राचा तीव्र निषेध केला. वाचा: लष्करी बंडाच्या पार्श्वभूमीवर, म्यानमारमध्ये सरकारी प्रसारमाध्यमे निर्बंधांखाली असून, फेसबुक बातम्या आणि माहिती मिळवण्याचा महत्त्वाचा स्रोत ठरले आहे. लष्कराविरोधातील आंदोलकांना संघटित करण्यासाठी हा व्यासपीठाचा वापर केला जात आहे. म्यानमारमध्ये लष्कराच्या बंडाविरोधात विविध क्षेत्रातील नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील लोक, शिक्षक, नोकरदार, व्यावसायिक लष्कराच्या दहपशाहीविरोधात आंदोलन करताना दिसत आहेत. वाचा: सरकारी रुग्णालये आणि संस्थांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी बुधवारी एक निवेदन जारी करत लष्करशाहीला विरोध दर्शवला आहे. कर्मचाऱ्यांनी लाल रिबीन बांधून लष्करशाहीचे आदेश मानणार नसल्याचे म्हटले. काही ठिकाणी कर्मचारी संपावर गेले आहेत. ‘घोटाळ्याची चौकशी होणार’ म्यानमारमध्ये नवर्निवाचित लष्करी अधिपत्याखालील सरकारची पहिली बैठक मंगळवारी पार पडली. करोना साथरोग नियंत्रणात आणणे, गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीतील तथाकथित घोटाळ्याची चौकशी करणे, आदी मुद्द्यांवर भर देणार असल्याचे लष्कराचे प्रमुख जनरल मिन आँग ह्लेइंग यांनी स्पष्ट केले.