सिंधुदूर्ग : कणकवलीतील पटवर्धन चौकात ऑन ड्युटी वाहतूक पोलिसांना पेट्रोल अंगावर ओतून जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तरुणाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार विश्वजित परब आणि हवालदार चंद्रकांत माने यांच्या अंगावर युवकाने पेट्रोल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. आरोपी तरुणाने बाटलीतून पेट्रोल आणले होते. ते त्याने हवालदार परब आणि हवालदार माने यांच्या अंगावर ओतले आणि पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी बाजूलाच उभे असलेल्या आरोग्य सेवक भालचंद्र साळुंखे यांनी त्या युवकाला पकडले. त्याला पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांवर हल्ला केलेल्या त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू केला आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने शहरासह पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. काय घडलं नेमकं ? पटवर्धन चौकात पोलीस, नगरपंचायतचे कर्मचारी कार्यरत होते. विनामास्क, विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि वाहतूक नियम, कोविड १९ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करत होते. विरुद्ध दिशेने एक तरुण दुचाकीवरून आला. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे लायसन्स, कागदपत्रे नव्हते. त्याला पकडले. त्याच्याकडे पैसे नव्हते. तो पुढे गेला. त्याने सोबत पेट्रोल आणले. त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
https://ift.tt/3saL9oc