'मेहनती पंतप्रधान'... मोदींवर लिहिलेल्या लेखाची जोरदार चर्चा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 12, 2021

'मेहनती पंतप्रधान'... मोदींवर लिहिलेल्या लेखाची जोरदार चर्चा

https://ift.tt/3o907Kg
नवी दिल्ली : 'पंतप्रधान खूप मेहनत घेत आहेत, विरोधी पक्षांच्या जाळ्यात अडकू नका', असं सांगणारा इंग्रजी भाषेतील एक लेख भाजपच्या केंद्रीय ते स्थानिक स्तरावरील नेत्यांकडून जोरदारपणे शेअर केला जात असल्याचं सोशल मीडियावर दिसून येतंय. यानंतर सोशल मीडियावर एका वेगळ्या चर्चेलाही सुरूवात झालीय. 'देशाला असे पंतप्रधान लाभलेत जे संकटसमयी शांतपणे आपलं काम करत आहेत आणि कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देण्यापासून ते दूर आहेत. कारण या सर्व गोष्टींसाठी ही वेळ योग्य नाही. ते आपलं लक्ष आणि ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी वापरत आहेत तसंच दुप्पटीनं काम करत आहेत. इतरांप्रमाणेच त्यांनीदेखील 'क्राय बेबी' बनून प्रश्नांचीच चर्चा केली तर उत्तरं कोण शोधणार?' असा या लेखात म्हटलं गेलंय. '' या आंतरराष्ट्रीय नावाशी साधर्म्य साधणारी वेबसाईट मंगळवारी ११ मे रोजी एखाद्या राष्ट्रीय कॅम्पेनप्रमाणे अनेक भाजप नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा लेख शेअर होत होता. हा लेख '' नावाच्या एका वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलाय. यूकेचं आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध 'द गार्डियन' या वर्तमानपत्राच्या नावाशी 'द डेली गार्डियन' हे नाव मिळतं-जुळतं असल्याचं अनेकांच्या ध्यानीही आलं असावं. कोण आहे लेखक? 'द क्विंट'नं दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेत्यांकडून हा लेख शेअर झाल्यानंतर काही वेळातच 'द डेली गार्डियन'ची वेबसाईट क्रॅश झाली. हा लेख सोशल मीडियावर स्वत:ची ओळख 'भाजप नॅशनल मीडिया टीम प्रतिनिधी' अशी करून देणाऱ्या यांनी लिहिलाय. 'नरेंद्र मोदी: द गेम चेंजर' हे पुस्तक याच सुदेश वर्मा यांनी लिहिलंय. वेबसाईवरच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह देशात करोनानं हाहाकार उडवून दिला असताना आणि यंत्रणाही कमी पडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक करणारी ही वेबसाईट चर्चेत आली नसती तरच नवल... 'द डेली गार्डियन' ई पेपरच्या ओपेड पेजवर हा लेख प्रसिद्ध करण्यात आलाय. एका आंतरराष्ट्रीय ब्रॅन्डशी साधर्म्य असणाऱ्या नावाचा वापर करणारी 'द डेली गार्डियन' हा आयटीव्ही नेटवर्कचाच एक भाग आहे. या वेबसाईटचा मालकी हक्क हरयाणाचे नेते विनोद शर्मा यांचा मुलगा कार्तिकेय शर्मा यांच्याजवळ आहे. न्यूज एक्स टीव्ही, इंडिया न्यूज (न्यूज चॅनल), द संडे गार्डियन असे चॅनल आणि साप्ताहिक पेपरही आहेत. भाजपचा कार्यकर्ता असणाऱ्या एका व्यक्तीनं लिहिलेला हा लेख केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, जितेंद्र सिह, किरण रिजीजू, जी किशन रेड्डी यांच्याही सोशल मीडियावर झळकू लागल्यानंतर यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या म्हणून भारतीय जनता पक्षाकडून असे खेळ खेळले जात असल्याची चर्चा आता सोशल मीडियात सुरू आहे.