जम्मू काश्मीरच्या कटरा भागाला भूकंपाचे धक्के, महिन्यातील दुसरी घटना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 19, 2021

जम्मू काश्मीरच्या कटरा भागाला भूकंपाचे धक्के, महिन्यातील दुसरी घटना

https://ift.tt/37WKG0E
जम्मू : केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये आज पहाटे भूकंपाचा जोरदार हादरा बसला. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल मोजण्यात आली. गुरुवारी पहाटे ५.०८ वाजता जम्मू काश्मीरमधल्या यात्रेकरूंत प्रसिद्ध असलेल्या भागाला जाणवल्यानंतर परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला. परंतु, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारच्या जीवितहानी किंवा वित्तहानीची बातमी अद्याप समोर आलेली नाही. उल्लेखनीय म्हणजे, ऑगस्ट महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या अगोदर ४ ऑगस्ट रोजी राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. पहाटे ४.०० वाजल्याच्या दरम्यान भूकंपाचा हादरा बसत असल्याचं जाणवल्यानंतर नागरिक भीतीनं घराबाहेर पडले होते. या भूकंपाची तीव्रता ५.२ रिश्टर स्केल मोजण्यात आली होती. 'जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओ सायन्सेस'च्या म्हणण्यानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होता. भूकंपाच्या तीव्र धक्क्यानंतरही इथे कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नव्हतं. भूगर्भीय हालचालींमुळे उत्तर भारतात गेल्या काही वर्षांपासून भूकंपाचा धोका वाढलेला दिसून येतोय.