दिलासा! मुंबईतील करोना रुग्णवाढ मंदावली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 10, 2021

दिलासा! मुंबईतील करोना रुग्णवाढ मंदावली

https://ift.tt/3xvgeEZ
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमध्ये करोना रुग्णांची संख्या कमी होत असून, शहरातील रुग्णवाढीचा साप्ताहिक दर हा राज्याच्या सरासरीपेक्षा कमी नोंदवण्यात आला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईचा हा दर ०.०२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. राज्याचा साप्ताहिक रुग्णवाढीचा दर हा ०.१० टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. मुंबईमध्ये दोन महिन्यांपूर्वी उपचाराधीन रुग्णांची संख्या अधिक होती. करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असून, रुग्णसंख्या आता कमी झाली आहे. लसीकरणाचे प्रमाण या कालावधीमध्ये वाढवण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. या टप्प्यावर निर्बंध शिथिल झाले, तरीही सार्वजनिक नियमांचे पालन करण्याची गरज संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आर.आर. मोहिते यांनी व्यक्त केली. हे निकष पाळले न गेल्यास रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अकोला, नागपूर, वाशिम, भंडारा, गडचिरोली, ठाणे, वर्धा या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा साप्ताहिक दर शून्य नोंदवण्यात आला आहे. ठाणे, नागपूर, वर्धा, अकोला येथे दोन महिन्यांपूर्वी रुग्णवाढीचे प्रमाण चिंताजनक होते. मात्र आता या जिल्ह्यांमध्ये दिलासा आहे. पुणे, बीड, लातूर, परभणी, औरंगाबाद, जालना, अमरावती, नाशिक, धुळे, हिंगोली, यवतमाळ चंद्रपूर, बुलडाणा, गोंदिया येथे साप्ताहिक रुग्णवाढ ही ०.०३ ते ०.०९ टक्के या दरम्यान नोंदवण्यात आली आहे. राज्यातील साप्ताहिक संसर्गदर ३.५३ टक्के असताना मुंबईमध्ये हे प्रमाण त्यापेक्षा कमी म्हणजे १.२६ तर ठाणे येथे १.५९, लातूरमध्ये १.४९, गडचिरोलीमध्ये १.३२, नाशिकमध्ये १.८५, रायगडमध्ये ३.४६ टक्के आहे. सातारा सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, रत्नागिरी येथे साप्ताहिक पॉझिटिव्हिटी ही ३.७६ ते ७.५६ टक्के नोंदवण्यात आली आहे. असे आहे चित्र... राज्याच्या साप्ताहिक सरासरीपेक्षा अधिक रुग्णवाढ जिल्हा - रुग्णवाढीचा दर पालघर ०.४५ सांगली ०.४३ सातारा ०.३८ रत्नागिरी ०.३३ सिंधुदुर्ग ०.३२ अहमदनगर ०.३२ सोलापूर ०.३० रायगड ०.२४ कोल्हापूर ०.२४ उस्मानाबाद ०.१९