तालिबानकडून काळजीवाहू सरकारची तयारी; हालचालींना वेग - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 30, 2021

तालिबानकडून काळजीवाहू सरकारची तयारी; हालचालींना वेग

https://ift.tt/2WBlFWo
काबूल: अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक असे काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात येईल, अशी माहिती तालिबानी नेत्यांनी दिल्याचे वृत्त पाकिस्तानातील माध्यमांनी दिले आहे. ‘येणाऱ्या काळात लवकरच आम्ही एक काळजीवाहू सरकार स्थापन करू. त्यामध्ये सर्व घटकांचा समावेश असेल,’ असे तालिबानच्या सल्लागार समितीच्या सदस्याने म्हटले आहे. ‘द न्यूज इंटरनॅशनल’ने दिलेल्या वृत्तानुसार, शुरा अर्थात सल्लागार समिती काळजीवाहू सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये तालिबानचे कमांडर, नेते यांचा समावेश आहे. अफगाणिस्तानातील सर्व वंशाचे, आदिवासी प्रांतात वास्तव्यास असलेले सर्व जण या सरकारमध्ये असतील. सध्याच्या स्थितीत अंदाजे डझनभर जणांची नावे निश्चित करण्यात आली आहे. या सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था, संरक्षण, गृह, परराष्ट्र, अर्थ, माहिती-तंत्रज्ञान अशा विविध खात्याचे मंत्री असतील; तसेच काबूलबाबत विशेष विभागही असेल. हालचालींना वेग पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानचा सहसंस्थापक मुल्लाह अब्दुल घनी बरादर सध्या काबूलमध्ये आहे, तर तालिबानी सैन्याचा प्रमुख मुल्लाह महंमद याकूब कंदहारमध्ये असून, काळजीवाहू सरकारच्या निर्मितीसाठी तो काबूलकडे निघाला आहे. काबूल विमानतळाच्या तीन प्रवेशद्वारांचा ताबा आम्ही घेतला आहे, असे तालिबानींनी शनिवारी रात्री उशिरा सांगितले होते. ‘टोलो न्यूज’च्या वृत्तानुसार ३१ ऑगस्टनंतर कोणत्याही देशाचे वर्चस्व आम्ही खपवून घेणार नसल्याचे तालिबानने म्हटले होते. दरम्यान याआधी तालिबानने अमेरिकेला ३१ ऑगस्टची सैन्य माघारीची मुदत पाळण्यास सांगितले होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी ३१ ऑगस्टपर्यंत सैन्य माघारी घेणार असल्याचे म्हटले होते. त्यांनी दिलेला शब्द पाळावा. ३१ ऑगस्टनंतर एकाही दिवसाची वाढीव मुदत मिळणार नसल्याचे तालिबानने म्हटले होते. अमेरिका अथवा इतर देशांचे सैन्य ३१ ऑगस्टनंतर अफगाणिस्तानमध्ये राहिल्यास परिणाम वाईट होतील असा इशाराही तालिबानने दिला होता.