करोनाकाळात अन्नपुरवठा वाटपात भ्रष्टाचाराचा संशय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 31, 2021

करोनाकाळात अन्नपुरवठा वाटपात भ्रष्टाचाराचा संशय

https://ift.tt/3ywgt3k
म. टा. विशेष प्रतिनिधी, करोनाकाळात विस्थापित कामगार, गरजू, बेघरांसाठी मोठ्या प्रमाणात खिचडी, पुलावसह अन्य शिजवलेल्या खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. यासाठी विविध पुरवठादार संस्थांना कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत. ही कामे देताना नियमभंग झाला आहे. अनेक मर्जीतील संस्थांना कामे दिली आहेत. किती आणि कोणत्या संस्थांना कंत्राटे दिली, बिलाची रक्कम याचे ऑडिट करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. करोना प्रतिबंधक काळात प्रशासनाने या खर्चाला मंजुरी दिली आहे का? दिलेली कंत्राटे नियमाप्रमाणे आहेत का? कोणत्या पुरवठादाराला किती निधीचे वाटप करण्यात आले? याचे ऑडिट करावे व पालिकेच्या नियोजन विभागाची चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.