Jammu Kashmir : नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मूमध्ये स्फोट, सभेच्या ठिकाणापासून १२ किमी अंतरावरील घटना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, April 24, 2022

Jammu Kashmir : नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मूमध्ये स्फोट, सभेच्या ठिकाणापासून १२ किमी अंतरावरील घटना

https://ift.tt/7hVLaMw
श्रीनगर : पंतप्रधान () आज जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त ते जम्मूमधील सांबा येथे सभेला संबोधित करणार आहेत. मोदींच्या सभेच्या ठिकाणाहून १२ किमी अंतरावर ललियाना (Laliyana) गावात एका शेतामध्ये स्फोट झाला आहे. पोलीस घटना स्थळी पोहोचले असून तपासकार्य सुरु करण्यात आलं आहे. तर, नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. जम्मूच्या बिश्नाहमधील ललियान गावातील स्थानिकांनी शेतामध्ये स्फोट झाल्याची माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांना वीज कोसळली असावी किंवा उल्कापात झाल्याचा अंदाज आहे. सुरक्षा दलांकडून सभेच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू मधील साबामधील पाली गावात सभेला संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी पंचायत राज दिवसानिमित्त संपूर्ण देशाला संबोधित करणार आहेत. सभेच्या ठिकाणी सुरक्षा दलांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांनी पंचायत राज दिवसाच्या निमित्तानं संपूर्ण देशावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्याचं समोर आलं आहे. जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षादलांनी जैश-ए-मोहम्मदच्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळवलं आहे. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मिरहामा येथे दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधकार्य सुरु करण्यात आलं होतं. यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये जैश ए मोहम्मदचे दोन दहशतवादी मारले गेले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक अद्याप सुरु आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी देखील दहशतवाद्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या दोन जवानांच्या हत्येत सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या स्थानिक अतिरेक्याला जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. काश्मीरचे पोलीस माहनिरीक्षक विजय कुमार यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा भागात आरपीएफ जवानांवर हल्ला करण्यात आला होता. त्यापैकी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती.