
मुंबई : शेअर बाजारात गेल्या आठवड्यात मोठी घसरण झाली होती. या काळात गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. मात्र नंतर बाजारात रिकव्हरी आली आणि मार्केटला गती मिळाली. आता सणासुदीला सुरुवात झाली असून दिवाळीचा सण जवळ आला आहे. असे अनेक गुंतवणूकदार आहेत, ज्यांना या खास दिवशी गुंतवणूक करायला आवडते. भारतातील व्यापारी आपल्या व्यवसायाच्या नवीन वर्षाची सुरुवात दिवाळीपासूनच करतात. त्यामुळेच देशातील दोन प्रमुख शेअर बाजार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) देखील त्या दिवशी उघडतात आणि 'मुहूर्त ट्रेडिंग'चे आयोजन होते. दिवाळीच्या दिवशी बाजार काही तासांसाठी उघडतो. पण कोणत्या स्टॉकवर डाव लावायचा हा मोठा प्रश्न आहे. पण गुंतवणूकदारांचा हा तणाव LKP सिक्युरिटीज लिमिटेडने दूर केला आहे. चला जाणून घेऊया लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर कोणते स्टॉक खरेदी करावेत. बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदाचा शेअर सध्या १३१ रुपयांच्या जवळ व्यवहार करत आहे. LKP सिक्युरिटीज लिमिटेडने यामध्ये ३४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली असून या स्टॉकवर रु. १७५ चे लक्ष्य घेऊन खरेदी करा. फेडरल बँक फेडरल बँकेचा शेअर सध्या १३० रुपयांवर व्यवहार करत असून या शेअरमध्ये तेजीची चिन्हे आहेत. LKP सिक्युरिटीज लिमिटेडने यामध्ये ३८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. या स्टॉकला LKP सिक्युरिटीज लिमिटेड द्वारे रु. १८० च्या लक्ष्यासह खरेदीचा सल्ला दिला आहे. श्नाइडर इलेक्ट्रिक श्नाइडर इलेक्ट्रिकचा स्टॉक रु. १७४ वर ट्रेडिंग करत आहे. LKP सिक्युरिटीज लिमिटेडने यामध्ये ३६ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. LKP सिक्युरिटीज लिमिटेड ने या समभागाला रु. २३६ चे लक्ष्य घेऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आर्थिक सल्लागाराची मदत घ्या कोणताही स्टॉक खरेदी करण्यापूर्वी नेहमी तुमच्या आर्थिक सल्लागाराला विचारा. अशा प्रकारे शेअर्स खरेदी केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. भारतीय स्टॉक एक्स्चेंज बीएसई आणि एनएसई सोमवारी (२४ ऑक्टोबर) दिवाळीच्या निमित्ताने एक तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र आयोजित करेल. एक तासाचे हे शुभ सत्र हिंदू दिनदर्शिकेनुसार संवत २०७९, नवीन वर्षाची सुरुवात होईल.