नवी संसद म्हणजे 'मोदी मल्टिप्लेक्स'! काँग्रेसची खोचक टीका; भाजपकडून जोरदार प्रत्युतर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 24, 2023

नवी संसद म्हणजे 'मोदी मल्टिप्लेक्स'! काँग्रेसची खोचक टीका; भाजपकडून जोरदार प्रत्युतर

https://ift.tt/lmAYFDB
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: नवीन संसद भवन हे 'मोदी मल्टिप्लेक्स'असल्याची खोचक टीका नेते जयराम रमेश यांनी शनिवारी केल्यानंतर संतापलेले अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसची खालच्या पातळीवरील मानसिकता यातून पुन्हा दिसली आहे, असा पलटवार केला. रमेश यांनी 'एक्स'या सोशल मीडिया मंचावरील एका पोस्टमध्ये संसदेच्या नव्या इमारतीतील त्रुटी सांगून याला 'मोदी मल्टिप्लेक्स' असे संबोधले होते. सन २०२४मध्ये सरकार बदलेल, तेव्हा संसदेच्या नवीन इमारतीचा अधिक चांगल्या प्रकारे वापर केला जाईल, असेही ते म्हणाले. 'जुन्या संसद भवनाची एक शान होती. दोन सभागृहे, सेंट्रल हॉल आणि कॉरिडॉर यांच्यामध्ये चालणे सोपे होते,' असे टीकास्त्र रमेश यांनी सोडले. 'त्याला 'मोदी मल्टिप्लेक्स' म्हणा किंवा 'मोदी मॅरियट' म्हणा. चार दिवसांत दोन्ही सभागृहांत सदोष यंत्रणेमुळे अनेकदा चर्चा कोलमडल्याचे मी पाहिले आहे. वास्तू खरोखरच लोकशाहीचा घात करू शकत असेल, तर पंतप्रधान यांनी घटनेचे पुनर्लेखन न करता ते करण्यात यश मिळवले आहे,' असेही टीकास्त्र रमेश यांनी सोडले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले की, हे वक्तव्य म्हणजे काँग्रेसच्या सध्याच्या अत्यंत सर्वात खालच्या पातळीची मानसिकता दर्शवते. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनीही रमेश यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. 'माझी तर हीच मागणी आहे की, देशातील 'राजवंशांच्या बुरुजांचे' मूल्यमापन करण्याची गरज आहे,' असे ते म्हणाले. 'नव्या संसद भवनात त्रुटी' दोन्ही संसदीय सभागृहांची रचना अशा पद्धतीने केली आहे की, खासदारांना एकमेकांकडे पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज असल्याची टीका रमेश यांनी केली असली, तरी नवीन संसदेच्या आतील रचना तुलनेने प्रचंड बंदिस्त व अनाकलनीय असल्याचा अनुभव अनेक खासदारांचा व संसदीय कर्मचाऱ्यांचाही आहे. या संसद भवनात वायुविजनाची सोय अनेक ठिकाणी नाही.