
दोन दिवसांपूर्वी दुष्काळाच्या बैठकीत काजू-बदाम खाल्ल्यामुळे अडचणीत आलेले परभणीचे खासदार संजय जाधव यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरांगे पाटील हे उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल आहेत. “अंतरवाली सराटी हे गाव माझ्या लोकसभा मतदारसंघातील आहे. त्यांचं आणि माझं नातं हे जिव्हाळ्याचं आहे. त्यामुळे माझ्या घरातील व्यक्ती जर आजारी असेल तर जाऊन भेटणार आणि त्यांची विचारपूस करणे माझं कर्तव्य आहे” असं संजय जाधव जरांगे पाटील यांच्या भेटीवर म्हणाले. सध्या दिशा सालियन प्रकरणावरुन बऱ्याच राजकीय घडामोडी सुरु आहेत. त्यावर मात्र संजय जाधव यांनी उत्तर देणं टाळलं. “त्या विषयावर नको ना बाबा आता, कारण तो विषय मला माहितीच नाही,ज्या विषयासाठी आलो त्याच विषयासाठी विचाराना” अशी प्रतिक्रिया दिली.
(बातमी अपडेट होत आहे)