
मागच्या अनेक दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळाने आज पहाटे भेट घेतली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे आणि प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. उपोषण मागे घ्यावं अशी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांना विनंती केली. गॅझेटियरची अंमलबजावणी जीआर काढून काढावीच लागेल. 58 लाख नोंदी कमी होणार नाही हे लेखी द्यावं लागेल. पुन्हा-पुन्हा तोच तोच घोळ नको. 58 लाख नोंदी, त्यांचं वाटप करणं वॅलिडिटी देण्यासंदर्भात लेखी द्यावं मुख्यमंत्री साहेब असतील त्यांनी प्रेस समोर येऊन शब्द द्यावा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
(बातमी अपडेट द्यावा)