'यो-यो' पास होऊनही निवड न होणं अयोग्य: युवी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 27, 2019

'यो-यो' पास होऊनही निवड न होणं अयोग्य: युवी

https://ift.tt/2n8WkS0
नवी दिल्ली: टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर युवराज सिंहने भारतीय निवड समितीवर आरोप केला आहे की त्याने २०१७ मध्ये पास करूनही टीम इंडियात त्याची निवड झाली नव्हती. २०११ वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजयात मोलाचं योगदान देणारा २०१७ मधील वेस्ट इंडिज दौऱ्यात फ्लॉप ठरला होता. त्यानंतर त्याला टीम इंडियात पुन्हा येण्याची संधी मिळाली नाही. टीम इंडियात आपलं पुनरागमन होईल या आशेवर असलेल्या युवराज सिंहने त्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, 'मी हा विचार कधीच केला नव्हता की चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ ज्या आसपास मी जे ८ किंवा ९ सामने खेळलो, त्यात दोन वेळा मॅन ऑफ द मॅचही राहिला. तरीही मला संघाबाहेर ठेवण्यात आले.' 'मी जायबंदी होतो. मला सांगितलं होतं की मी श्रीलंका दौऱ्याची तयारी करावी. मग अचानक यो-यो चाचणी आली. माझ्या निवडीत हा यु-टर्न होता. अचानक मला माघारी परतून वयाच्या ३६ व्या वर्षी यो-यो टेस्टची तयारी करावी लागली,' असं युवराज म्हणाला. आज तक वाहिनीला त्याने ही मुलाखत दिली. तो म्हणतो, 'मी यो-यो चाचणीही उत्तीर्ण झाले, मग मला सांगितलं की मी देशांतर्गत क्रिकेट खेळू. त्यांना कदाचित असं वाटलं असेल की माझं वय पाहता मी ही टेस्ट पास करणार नाही आणि मला टीमबाहेर ठेवणं त्यांना सोपं जाईल.' युवराज सिंहने आपल्या इंटरनॅशनल करिअरमध्ये ३०४ वनडे आणि ५८ टी-२० इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. यात त्याने वनडेत ८,७०१ धावा तर टी-२० मध्ये १,१७७ धावा केल्या आहेत.