मुंबई: कारच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 7, 2019

मुंबई: कारच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

https://ift.tt/2s02yWL
मुंबई: काल (शुक्रवार) रात्री एका भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याने चुनाभट्टी परिसरात जनक्षोभ उसळला आहे. कारमध्ये एकूण ४ तरुण होते आणि ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. मद्यधुंद अवस्थेत असल्याने कारवरील ताबा सुटल्याने त्यांनी रस्त्यालगत चालणाऱ्या तरूणीला धडक दिली. याच तिचा मृत्यू झाला. अर्टना पोर्टे असे मृत तरुणीचे नाव आहे. जो पर्यंत दोषींवर तत्काळ कारवाई होत नाही, तो पर्यंत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृत मुलीच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. दरम्यान, पोलिसांनी चौघांपैकी ३ आरोपींना अटक केली आहे. चुनाभट्टी परिसरात काल रात्री पावणे नऊ ते सव्वा नऊच्या सुमाराला हा अपघात झाला. काल रात्री दोन तरुणीबाहेर निघाल्या असता त्यांची मैत्रिण अर्चना ही देखील कंटाळा आला म्हणून सहज त्यांच्यासोबत बाहेर निघाली होती. ती दोघींच्या काहिशी पुढे चालत होते. काही कळण्याच्या आत मागून भरधाव वेगात कार आली आणि अर्चनाला धडक दिली आणि कार तशीच पुढे निघून गेली. यात अर्चनाता मृत्यू झाला. या घटनेनंतर सोबतच्या दोन मुलींना मोठा धक्का बसला असून त्यातील एक तरुणी अजूनही धक्क्यातून सावरलेली नाही. 'तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही' या गाडीत ४ मद्यधुंद तरुण बसले होते, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. शिवाय त्यांच्या कारमध्ये मद्याच्या बाटल्याही होत्या. हे ड्रंक अॅण्ड ड्राइव्हचे प्रकरण असून त्या चार तरुणांना कठोरातील कठोर शिक्षा मिळायला हवी अशी मागणी चुनाभट्टीतील नागरिक करत आहेत. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे... जो पर्यंत त्यांना शिक्षा होत नाही, तो पर्यंत आम्ही आमच्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा अर्चना पोर्टे हिच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.