राष्ट्रपती, PM मोदींनी जनतेला दिल्या होळीच्या शुभेच्छा - Times of Maharashtra

Monday, March 29, 2021

demo-image

राष्ट्रपती, PM मोदींनी जनतेला दिल्या होळीच्या शुभेच्छा

https://ift.tt/3m3S3JY
photo-81743026
नवी दिल्लीः करोना संकटाच्या सावटाखाली यंदाचा होळी सण साजरा होतोय. करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सार्वजनिक ठिकाणं आणि गर्दी करण्यावर अनेक निर्बंध आणि नियमांमुळे यंदा होळीचा रंग फिका पडला आहे. नागरिकांना घरातच सण साजरा करण्याचं आवाहन केलं गेलंय. नागरिकांमधील उत्साह कायम ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी होळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. होळीच्या सणाने प्रत्येकाचा जीवनात एक नवीन उत्साह आणि नवीन ऊर्जा भरतो, असं मोदी म्हणाले. राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदींसह सर्व प्रमुख नेत्यांनी जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळी रंगांचा सण आहे. यामुळे समाजात सौहार्द निर्माण होऊन प्रत्येकाच्या जीवनात आनंद, उत्साह भरतो. उत्साह आणि उल्हासाचा हा सण आपली सांस्कृतीक विविधता दर्शवतो. सर्वांना राष्ट्रीय चेतना आणि शक्ती मिळू दे, अशा शुभेच्छा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्या आहेत. आपल्या सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आनंद, हर्ष आणि उल्हासासोबत या सणाद्वारे सर्वांच्या जीवनात नवा उत्साह आणि ऊर्जा मिळावी, असं पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. होळीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. रंग, एकता आणि सदिच्छेच्या या महापर्वात आपणा सर्वांच्या जीवनात आनंद, शांती आणि सौभाग्य लाभो", असं ट्वीट शहा यांनी केलंय. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देशातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Pages