एजाजला १० विकेट घेण्यापासून रोखण्यासाठी सिराजने केली अशी होती प्लॅनिंग; पाहा व्हिडिओ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 5, 2021

एजाजला १० विकेट घेण्यापासून रोखण्यासाठी सिराजने केली अशी होती प्लॅनिंग; पाहा व्हिडिओ

https://ift.tt/3xXMAdG
: मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू एजाज पटेलने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे ही कसोटी वेगळी ठरली आहे. एजाजने पहिल्या डावात भारताचे सर्व १० गडी बाद केले. आणि असा पराक्रम करणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद सिराजला बाद करून त्याने हा इतिहास रचला, पण एजाजला हा इतिहास रचण्यापासून रोखण्यासाठी मोहम्मद सिराजने विशेष योजनाही आखली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मोहम्मद सिराजने आपल्या मनात त्यावेळी काय चालले होते, याचा खुलासा केला. खरे तर एजाज इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर असताना उमेश यादव आणि मोहम्मद सिराज ही भारताची शेवटची जोडी मैदानात खेळत होती. मोहम्मद सिराजने सांगितले की, 'एजाजने चांगली गोलंदाजी केली होती, त्यामुळे मलाही थोडे दडपण जाणवले. त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ती कमालीची होती. त्यामुळे त्याच्यावर जेवढा दबाव टाकता येईल, तेवढा दबाव टाकण्याचा माझा प्रयत्न होता, पण दुर्दैवाने मी बाद झालो. मला 'ऑनर्स बोर्ड'वर यायचं होतं इतिहास रचल्यानंतर एजाज पटेलने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. तो म्हणाला की, 'ही गोष्ट माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या पत्नीसाठी खूप विशेष आहे. एक क्रिकेटपटू म्हणून तुम्ही बराच वेळ घरापासून दूर राहता. त्यामुळे या संधीसाठी मी देवाचा आभारी आहे. ही माझ्यासाठी खूप खास कामगिरी आहे. यावेळी एजाजने अनिल कुंबळेचाही उल्लेख केला. किवी गोलंदाज म्हणाला की, 'हो, मला आठवते की त्याने (कुंबळेने) १० विकेट घेतल्या होत्या. त्या सामन्याची हायलाइट मी अनेकदा पाहिली आहे. या क्लबचा () भाग बनणे खूप छान आहे. त्यानी दिलेला संदेश पाहूनही आनंद झाला. या यशात त्यांच्यासोबत जोडले जाणे, हे मी माझे भाग्य समजतो.' भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना तुझ्या मनात १० विकेट्स घेण्याचा विचार आला होता का? या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला की, 'नाही. मला माहित होते की, यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, पण मला 'ऑनर्स बोर्ड'वर यायचे होते, हे इतक्या लवकर घडणे विशेष होते.'